ज्येष्ठ आणि जबाबदारी

कोण संभाळतो जबाबदारी अन
कोण देतो जबाब उलटा
या दुनियेच्या क्षितिजावरती
चलन हे मानवाचे,

लहानांना जपणे 
हवे नको ते बघणे
शिक्षण व इतर पाहणे
कर्तव्य ज्येष्ठांचे,

वेळप्रसंगी आपली पोळी
त्यांच्या ताटात ठेवणे
आपल्या इच्छा आकांक्षा
मारून टाकणे,

लहानांसाठी आपलं
आयुष्य वेचणे
आपले त्यांच्यावरील प्रेम 
ओवाळून टाकणे,

करून इतकं काय 
मिळतं हो...?
कोणता उपहार
कोणतं बक्षीस,

काय हवं त्यास मोबदला
काय हवी त्यास संपत्ती
का हे एवढं कष्ट घेतलं 
का सोसला कष्टाचा डोंगर,

न राहिली जाणीव कष्टाची
न राहिलं स्मरण कार्याचं
कारण आता त्यांच्या
पंखामध्ये बळ आलंय,

कोणाचा आधार नकोय
आणि जबाबदारी तर
मुळीच नकोय
का...?

परतफेडीची वेळ
येते तेव्हा,
परत मागे वळूनही
न पाहणारे कनिष्ठ,

हो कनिष्ठच ते
वयाने ही कनिष्ठ
का झाले ते
मनाने ही कनिष्ठ,

कोणी म्हणेल
का ही दिन भाषा
तुम्ही का अवलंबून
राहता त्यांच्यावर,

त्यांसी काय बोलावे
त्यांसी कैसे उमगावे
गणित हे आयुष्याचे
आपला गुणाकार दुसऱ्यांचा तो भागाकार

थकले ज्येष्ठांचे हात
त्यामुळेच तर ही 
वेळ आली
बेरीज संपली वजाबाकी सुरू झाली

मोबदल्यात मिळालं
उरलेलं आयुष्य
त्यात पुन्हा कमवावं
आणि पुन्हा जमवावं

परतीच्या वाटेवर
पुन्हा भरारी मारता येईल का
गणित जुळवता येईल का
हा प्रश्न प्रत्येक ज्येष्ठांचा...

Comments